गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४

एक अबोल प्रश्न ???

वृक्षासारखे मन माझे सावली देते सर्वांना 
ऊन्हाची रग सोसून शीतलता देते पांथस्थांना …। 

पंथास्थांचा लोभ किती भुका 
करितो माझ्या  मनावारी टीका …… 

फळ दे , फुल दे , गार वारा सुद्धा मागशील 
माझ मन तृप्त करण्यासाठी पांथस्थ तू किती प्रयत्नशील ????

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०१४

प्रेमाचे गुपित 

 आपल सगळ असच असत , 
सगळ जगजाहीर असत …. 

पोटात एक आणि ओठात एक हे काही जमत नाही ,
एवढ्या मोठ्या जगात खरचं  काही लपत नाही …. 

म्हणून मित्रांनो खुल्याने प्रेम करा ,
कारण प्रेम हे जगापेक्षाही श्रेष्ठ असत ……… 
Hi everybody