मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०१४

मला तुला भेटायच होत
मनातल सगळ सांगायच होत
डोळे भरून तुला पहायच होत
मनसोक्त तुझ्यासमोर रडायच होत
खूप काही बोलायच होत
खूप काही ऐकायच होत
तुझ्या डोळ्यात स्वतःला पहायच होत
तुझ्या तोंडून माझ नाव ऐकायच होत
पण झाल ते ह्याहून खूप वेगळच होत
तुझ्याशिवाय मला जगाव लागल
तू रडताना मला हसाव लागल
तू थांबवताना मला जाव लागल
तुला पाहून मला लपाव लागल
जे झाल ते झेलाव लागल
ऐवढ होऊनही तुझ्यासाठी
फक्त तुझ्यासाठी
मला जगाव लागल ....
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही अस
ंम्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे,
असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य
तुमच्यातही लपला आहे.
आवाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल
तो

तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणतो......... 
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा.. 



\

शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

कविता तेंव्हाही सुचतात...
जेंव्हा सोबती कुणी नसते...
विरानीच्या वाटेवरती...
जेंव्हा गणित आयुष्याचे चुकते...
.
.
शब्दही बंदिस्त आरक्त या ओठी...
तिथं यमकछंदांच काय...?
अबोल भावना जर मनी दबल्या...
तिथं व्याकरणाचं काय...?
.
.
भावनेला या जेंव्हा...
शब्दांची जाग येईल...!
थरथरत्या ओठांनी अन दाटलेल्या आसवांनी...
कवितेची तेँव्हा बाग होईल...
.
.
बागेत त्या फुले वेचण्या...
सईही मग दंग होईल...
अवखळ तिझिया ओंजळीतुन...
शब्दगंधांची धारा वाहील....
.
.
अल्लड तिझिया चाळ्यांना...
भावनांची आता किनार असेल....
हृदयी जपलेल्या स्वप्नांना....
भविष्याची तेंव्हा वाट दिसेल...
 मला कधीच वाटले नव्हते !!
मला कधीच वाटले नव्हते कि
तूझ्या आठवणी माझ्या चार ओळी बनतील
त्या भावना ती स्वप्ने कधी माझे बोल बनतील
मला कधीच वाटले नव्हते कि
तुझा सोबत घालवलेले क्षण माझी चारोळी बनतील
तुझे बोल तुझे नाव कोणासाठी तरी आरोळी बनतील
मला कधीच वाटले नव्हते कि
आपल्या आठवणी आपल् प्रेम कोणासाठी तरी आपलंस बनतील
आपला सहवास आपल् नात कोणासाठी तरी त्याचे काही क्षण बनतील
मला कधीच वाटले नव्हते कि
तू दिलेला मला नकार कोणासाठी तरी आपला अनुभव बनतील
मी उतरवलेला तुझा वेदना तुझा विरह कोणासाठी तरी त्याचा आधार
बनतील
मला कधीच वाटले नव्हते ..
मला कधीच वाटले नव्हते ..

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४

एक अबोल प्रश्न ???

वृक्षासारखे मन माझे सावली देते सर्वांना 
ऊन्हाची रग सोसून शीतलता देते पांथस्थांना …। 

पंथास्थांचा लोभ किती भुका 
करितो माझ्या  मनावारी टीका …… 

फळ दे , फुल दे , गार वारा सुद्धा मागशील 
माझ मन तृप्त करण्यासाठी पांथस्थ तू किती प्रयत्नशील ????

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०१४

प्रेमाचे गुपित 

 आपल सगळ असच असत , 
सगळ जगजाहीर असत …. 

पोटात एक आणि ओठात एक हे काही जमत नाही ,
एवढ्या मोठ्या जगात खरचं  काही लपत नाही …. 

म्हणून मित्रांनो खुल्याने प्रेम करा ,
कारण प्रेम हे जगापेक्षाही श्रेष्ठ असत ……… 
Hi everybody