शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

कविता तेंव्हाही सुचतात...
जेंव्हा सोबती कुणी नसते...
विरानीच्या वाटेवरती...
जेंव्हा गणित आयुष्याचे चुकते...
.
.
शब्दही बंदिस्त आरक्त या ओठी...
तिथं यमकछंदांच काय...?
अबोल भावना जर मनी दबल्या...
तिथं व्याकरणाचं काय...?
.
.
भावनेला या जेंव्हा...
शब्दांची जाग येईल...!
थरथरत्या ओठांनी अन दाटलेल्या आसवांनी...
कवितेची तेँव्हा बाग होईल...
.
.
बागेत त्या फुले वेचण्या...
सईही मग दंग होईल...
अवखळ तिझिया ओंजळीतुन...
शब्दगंधांची धारा वाहील....
.
.
अल्लड तिझिया चाळ्यांना...
भावनांची आता किनार असेल....
हृदयी जपलेल्या स्वप्नांना....
भविष्याची तेंव्हा वाट दिसेल...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा